
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. या प्रकरणात अमित सुरवसे या राष्ट्रवादी समर्थकासह सहा जणांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागे 2021 च्या जुन्या वादाचा बदला असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.