

rajan patil mohol solapur
esakal
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर गाव राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत राहिले आहे. येथील नगरपंचायत निवडणूक ही फक्त स्थानिक पातळीची नाही, तर राज्याच्या राजकारणातील वादग्रस्त घडामोडींचे प्रतिबिंब ठरली आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या कुटुंबाचे या भागात तीस वर्षांचे वर्चस्व असले तरी नुकत्याच घडलेल्या घडामोडींमुळे या वर्चस्वाला हादरा बसला.
अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच होणाऱ्या निवडणुकीत १७ नगरसेवकांच्या जागा बिनविरोध गेल्या, पण नगराध्यक्षपदावर थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने राजन पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. यातूनच राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत (बाळराजे) पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिले, ज्यामुळे हा वाद राज्यपातळीवर पोहोचला आहे.