सोलापूर बार असोसिएशनचा नवा अध्यक्ष कोण? ॲड. गायकवाडविरूध्द ॲड. फताटे यांच्यात लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election
सोलापूर बार असोसिएशनचा नवा अध्यक्ष कोण? ॲड. गायकवाडविरूध्द ॲड. फताटे यांच्यात लढत

सोलापूर बार असोसिएशनचा नवा अध्यक्ष कोण? ॲड. गायकवाडविरूध्द ॲड. फताटे यांच्यात लढत

सोलापूर : येथील वकिलांच्या बार असोसिएशनसाठी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तत्पूर्वी, अध्यक्षपदासाठी ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. राजेंद्र फताटे या दोघांच्या विधीसेवा व विधी विकास पॅनलमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘विधी विकास’ पॅनलमधून अध्यक्षपदासाठी पॅनलप्रमुख स्वत: ॲड राजेंद्र फताटे, उपाध्यक्षासाठी ॲड. आसिम बांगी, सचिवपदासाठी ॲड. करण भोसले, खजिनदार पदासाठी ॲड. अविनाश काळे आणि सहसचिव पदासाठी ॲड. शाहीन शेख हे उमदेवार मैदानात उतरले आहेत. या पॅनलने नवोदित वकिलांना मानधन मिळवून देऊ, प्रशस्त सभागृह, अद्ययावत लायब्ररी, वकिलांच्या संरक्षणासाठी संरक्षण समिती, वकिलांना न्यायाधीश होण्याची संधी मिळावी म्हणून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्याची ग्वाही जाहीरनाम्यातून दिली आहे. तर ‘विधीसेवा पॅनल’कडून अध्यक्षपदासाठी पॅनलप्रमुख ॲड. सुरेश गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उपाध्यक्षासाठी ॲड. सिध्दाराम म्हेत्रे, सचिव पदासाठी ॲड. अभिजित देशमुख, सहसचिव पदासाठी अनिता रणशृंगारे व खजिनदार पदासाठी ॲड. अब्दुल शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ॲड. गायकवाड यांच्या विधीसेवा पॅनलने देखील नवोदित वकिलांचाच मुद्दा जाहीरनाम्यात अधोरेखित करीत त्यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविण्याची ग्वाही दिली आहे.

बार असोसिएशनचे उमेदवार

  • अध्यक्ष : ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. राजेंद्र फताटे.

  • उपाध्यक्ष : ॲड. सिद्धाराम म्हेत्रे, ॲड. आसिम बांगी.

  • सचिव : ॲड. अभिजित देशमुख, ॲड. करण भोसले, ॲड. लक्ष्मण पाटील.

  • सहसचिव : ॲड. अनिता रणशृंगारे, ॲड. शाहिन शेख, ॲड. सुवर्णा शिंदे.

  • खजिनदार : ॲड. अब्दुल शेख, ॲड. अविनाश काळे, ॲड. संतोषकुमार बाराचारे, ॲड. विनयकुमार कटारे व ॲड. एच. अगनुर.

सचिव-सहसचिव अन्‌ खजिनदारासाठी अधिक उमेदवार

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची थेट निवडणूक होईल हे स्पष्ट झाले आहे. पण, सचिव, सहसचिव पदासाठी प्रत्येकी एक तर खजिनदार पदासाठी तिघांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले आहेत. अर्जावर आज (शनिवारी) हरकती नोंदवता येणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यावेळी सर्व लढतींचे चित्र स्पष्ट होईल.