सोलापूर बार असोसिएशनचा पुढचा अध्यक्ष कोण? अध्यक्षपदासाठी ४, उपाध्यक्षपदासाठी ६, खजिनदारपदासाठी २, सचिवपदासाठी ४, सहसचिव पदासाठी ३ इच्छुक, आज अर्जांची छाननी

सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी १९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात अध्यक्षपदासाठी चौघांचे तर उपाध्यक्षपदासाठी सहाजणांनी अर्ज केले आहेत. तर खजिनदार पदासाठी दोघांचे, सचिवपदासाठी चार आणि सहसचिव पदासाठी तिघांचे अर्ज आले आहेत. अर्जांची शुक्रवारी छाननी होणार आहे.
nandurbar voting
Solapur Bar Association votingEsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी १९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात अध्यक्षपदासाठी चौघांचे तर उपाध्यक्षपदासाठी सहाजणांनी अर्ज केले आहेत. तर खजिनदार पदासाठी दोघांचे, सचिवपदासाठी चार आणि सहसचिव पदासाठी तिघांचे अर्ज आले आहेत. अर्जांची आज (शुक्रवारी) छाननी होणार आहे.

सोलापूर बार असोसिएशनसाठी आता अध्यक्षपदासाठी चौघांचे अर्ज आल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दोन पॅनेलमध्ये निवडणूक होईल, अशी शक्यता असल्याने आता कोण माघार घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २३ व २४ जून रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतर पाच दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. ३० जून रोजी मतदान होणार असून त्या दिवशी सुमारे १५०० वकील मतदान करतील. या निवडणुकीत मागचे पदाधिकारी ज्यांच्यासोबत त्या पॅनेलचे, उमेदवारांचे पारडे जड असणार हे नक्की.

ॲड. बाबासाहेब जाधव यांनी अध्यक्ष होण्यासाठी कंबर कसली असून त्यांच्या विरोधातील उमेदवार देखील अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावत आहेत. या निवडणुकीत प्रत्येकजण आपल्या विजयासाठी लढणार की संपूर्ण पॅनेल विजयी व्हावा म्हणून क्रॉस वोटिंग टाळणार, याचीही उत्सुकता आहे. असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲड. मनोज पामूल या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.

निवडणुकीच्या रिंगणातील वकील...

  • अध्यक्ष : बाबासाहेब जाधव, राजेंद्र फताटे, शिवशंकर घोडके व एम. आर. म्हमाणे.

  • उपाध्यक्ष : नागनाथ बिराजदार, रविराज सरवदे, रियाज शेख, अविनाश बिराजदार, आसिफ शेख, परवेज ढालायत.

  • खनिजदार : अरविंद देढे, संतोषकुमार बाराचारे.

  • सचिव : मंजुनाथ कक्कळमेली, बसवराज हिंगमिरे, मायप्पा गौडनवरू, संदीप बेंद्रे.

  • सहसचिव : मिरा प्रसाद, प्रियंका गोरंटी, रविंद्रकुमार गावडे.

पाच जागांसाठी १९ उमेदवार

सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व सहसचिव या पाच पदांसाठी एकूण १९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यातील नऊ उमेदवार अर्ज माघार घेतील, असा अंदाज आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये कोण असणार?, कोणाला कोणत्या पॅनेलकडून उमेदवारी मिळणार?, याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून २४ जून रोजी सगळे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com