
सोलापूर : मंदिर- मशिदींमध्ये भेदभाव कशासाठी?
सोलापूर - मंदिराकरिाता स्पीकर परवानगीसाठी धर्मदाय आयुक्तांच्या पत्राची मागणी केली जात आहे. मशिदीला मात्र वक्फ बोर्डाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात आहे. पोलिस प्रशासनाने मंदिर- मशिदीमध्ये भेदभाव करू नये, वक्फ बोर्डाप्रमाणे मंदिर समितीचेही पत्र ग्राह्य धरावे, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महराज इंगळे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमधील स्पीकर परवानगीचा शासनाने एकच आदेश काढून मंजुरी जाहीर करावी. प्रत्येक मंदिराला वेगवेगळी मंजुरी घेण्यासाठी भाग पाडू नये, असेही त्यांनी या निवनेदानात म्हटले आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना ईमेलद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
वारकरी संप्रदाय हा कीर्तन व प्रवचन हे केवळ धर्मकारण म्हणून स्वीकारत नसून समाज प्रबोधन - जनजागृती या विचाराने करत आहेत. कीर्तन हे फक्त पूजापाठ, नित्यनेम, विधी नसून समाज घडविण्याचं श्रेष्ठ माध्यम आहे. समाज मनावर संस्कार करून त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न कीर्तन परंपरा करत आहे. समाजाला दिशा देण्याचे मोलाचे कार्य या परंपरेकडून सातत्याने घडत आहे. त्यामुळे कीर्तनाकडे पाहताना समाज उपयोगी प्रभावी व सर्व मान्य माध्यम आहे, असे पाहावे. त्यामुळे प्रत्येक मंदिराने स्वतंत्र परवाना काढण्या पेक्षा महाराष्ट्र शासनाने सामाजिक गरज म्हणून सर्वाना एकच परवानगी जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्रात सर्व मंदिरात तीव्र आंदोलन करू असा इशारा वारकरी मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
Web Title: Why Discriminate Between Temple Masjit Demand Of Sudhakar Ingale Maharaj
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..