esakal | खासगी डॉक्‍टरांवर विनाकारण चिखलफेक कशासाठी? 
sakal

बोलून बातमी शोधा

doctor.jpg

प्रत्यक्षात कोरोनाचे रुग्ण केवळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश होते. त्यानंतर उशिरा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना उपचाराची परवानगी दिली. त्या आधारावर खासगी रुग्णालयांनी उपचार सुरू केले

खासगी डॉक्‍टरांवर विनाकारण चिखलफेक कशासाठी? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: कोरोना संकटात वास्तवाचे भान न ठेवता खासगी डॉक्‍टरांवर विनाकारण होत असलेली चिखलफेक थांबवावी, अशी स्पष्ट भूमिका रुग्णालय चालक संघटना व आयएमएने घेतली आहे. 

हेही वाचाः या अधिकाऱ्याच्या घरात 11 लाखांची जबरी चोरी 

कोरोना संकटात शासकीय रुग्णालयात 120 बेड क्षमतेच्या आयसीयूत उपचाराची सोय केली आहे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय ही संस्था जिल्ह्यात सर्वात मोठी उपचार करणारी संस्था मानावी लागेल अशा पद्धतीची आहे. येथे डॉक्‍टर, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. 763 बेड क्षमता असताना येथे प्रत्यक्षात केवळ 120 बेडची सोय कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी केली आहे. अन्य विभागातील बेड्‌स अजूनही रिकामे आहेत. अनेक प्रकारच्या सोयी असताना या क्षमताचा वापर पूर्णपणे केला जात नाही. रुग्णाच्या सेवेसाठी मनुष्यबळ असताना त्याचा उपयोग केल्यास कितीतरी अधिक रुग्णांना सेवा देता येते. 
मनपाची दाराशा व डफरीन रुग्णालये उपलब्ध होऊ शकतील. 

हेही वाचाः मंगळवेढ्यात साथरोग सर्वेक्षणाला सुरुवात

प्रत्यक्षात कोरोनाचे रुग्ण केवळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश होते. त्यानंतर उशिरा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना उपचाराची परवानगी दिली. त्या आधारावर खासगी रुग्णालयांनी उपचार सुरू केले. तसेच मनपा आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर पी. शिवशंकर यांनी विश्‍वासात घेऊन खासगी रुग्णालयांना उपचाराची परवानगी दिली. तसेच नॉन कोविड प्रकारच्या सेवाही सुरू झाल्या. महागडे कोरोना संरक्षक साहित्य व काम करण्यासाठी तयार नसलेले कर्मचारी या अडचणीतून खासगी रुग्णालये मार्ग काढत आहेत. तशाही स्थितीत मार्कंडेय व यशोधरा रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांना अपुरे कर्मचारी बळ असताना ते सेवा देत आहेत. या शिवाय अनेक डॉक्‍टरांना मधुमेह, रक्तदाब व हृदयविकार असल्याने त्यांना सेवा देण्याच्या मर्यादा येतात. जास्त वयाच्या पोलिसांना शासनाने कामापासून दूर केले तर जास्त वयाच्या डॉक्‍टरांना हाच नियम लागू होतो. हे वास्तव समजून न घेता नोटिसा देण्याच्या कारवाया केल्या जात आहेत. ही स्थिती समजून न घेता कोणही उठसूट खासगी डॉक्‍टरवर आरोप करणे चुकीचेच आहे, अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे. 

काय आहे वास्तव 
50 पेक्षा अधिक वयाचे अनेक डॉक्‍टर 
काही डॉक्‍टरांना रक्तदाब, मधुमेहासारखे आजार 
कोरोनाच्या भितीमुळे कर्मचारी नसल्याने उपचाराची मर्यादा 
कोरोना उपचाराची परवानगी दिल्यानंतरच सेवा केली सुरू 
व्हेटीलेटरसारख्या महागड्या यंत्रणा उपलब्ध नाहीत 

व्हेंटीलेटर ही उपचाराची गरज 
अधिक वयाचे व आजार असलेल्या डॉक्‍टरांना शासकीय कर्मचाऱ्यासारखा नियम लागू होतोच. कोरोनाने रुग्णालयात कामगार नाहीत व महागडे व्हेंटिलेटर घेता येत नाहीत तर हे प्रश्‍न समजून न घेता आरोप करणे चुकीचेच ठरते. 
डॉ. सुदीप सारडा,अध्यक्ष, रुग्णालय चालक संघटना 

मनुष्यबळ नसेल तर सेवा देणे अशक्‍य 
खासगी रुग्णालयात कर्मचारी व कामगार कोरोना संकटामूळे उपलब्ध होत नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे कुणी काम करण्यास तयार नाहीत. तेव्हा रुग्णांना सेवा देण्यासाठी मनुष्यबळ नाही हे समजून घ्यायला हवे 
डॉ. हरीश रायचूर,अध्यक्ष आयएमए