Solapur : मारायचं होतं सासूला, पण पतीचा मृत्यू; प्रेमप्रकरणातून विषप्रयोग, पत्नी अन् प्रियकराला अटक

Pandharpur Crime News अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सासूची हत्या करण्यासाठी सुनेनं विषप्रयोग केला. पण सासूऐवजी पतीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
crime

crime

sakal

Updated on

पत्नीने प्रियकराच्या मदतीने सासूला विष देण्याचा कट रचला मात्र पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना उंबरगाव (ता. पंढरपूर) येथे घडली. उंबरगाव येथील समाधान लोहार (वय ३४) यांचा विवाह २०१३ मध्ये सारिका (वय ३२) हिच्याशी झाला. विवाहानंतर काही वर्षांनी सारिका व तिची सासू विमल यांच्यात वाद होऊ लागले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com