
पंढरपूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने कोयत्याने हल्ला करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथे बुधवारी (ता. १८) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये संशयित आरोपी पतीसह दोन लहान मुलंही गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.