Wild Buffalo : गव्याच्या एंट्रीने सलगर परिसरात दहशत; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

जंगलात राहणाऱ्या जंगली रान गव्याचे सोलापूर जिल्ह्यातील सलगर बुद्रुक गावच्या परिसरात एन्ट्री झाल्याने सलगर बुद्रुक सह आसपासच्या गावांमध्ये भीतीपोटी दहशतीचे वातावरण पसरले.
Wild buffalo
Wild buffalosakal

सलगर बुद्रुक, जिल्हा सोलापूर - जंगलात राहणाऱ्या जंगली रान गव्याचे सोलापूर जिल्ह्यातील सलगर बुद्रुक गावच्या परिसरात एन्ट्री झाल्याने सलगर बुद्रुक सह आसपासच्या गावांमध्ये भीतीपोटी दहशतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 16 रोजी सलगर खुर्द हद्दीतून या रान गव्याचे सलगर बुद्रुक हद्दीत आगमन झाले. सर्वप्रथम सलगर बुद्रुक येथील शेतकरी राम कदम यांच्या द्राक्ष बागेत या गव्याचे दर्शन झाले. कदम यांनी तात्काळ गावातील वनविभागाच्या अधकाऱ्यांना फोन वरून माहिती दिली. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.

गावातील नागरिकांनी रान गवा पाहण्यासाठी कदम यांच्या शेताकडे धाव घेतली. गव्याला पाहून अनेकांनी फोटो व व्हिडीओ काढले. फोटो व व्हडिओ व गावातील सर्व व्हाट्सएप ग्रुपवर व्हायरल झाले.

शेतकऱ्यांचे नुकसान -

रान गव्याच्या एंट्रीने दहशतीचे वातावरण तर होतेच. परंतु, शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. सलगर बुद्रुक येथील शेतकरी राम कदम यांच्या द्राक्षबागेतील द्राक्षघडांचे नुकसान झाले. तसेच गावातील दुसरे शेतकडी खंडडू धायगोंडे यांच्या शेततळ्यात गवा घुसल्याने शेततळ्यातील प्ल्यास्टिक कागदाचे मोठे नुकसान झाले आहे. सदरच्या शेतकऱ्याने वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

दरम्यान गव्याच्या भीतीपोटी शेतकरी व कामावर जाणारे शेतमजुर भीतीपोटी शेतात जाण्याचे टाळत आहेत. शाळकरी मुलांमध्येही भीतीचे वातावरण आहे. एकंदरीत गव्याच्या एंट्रीने सलगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खंडडू धायगोंडे, शेतकरी सलगर बुद्रुक -

आमच्या शेतात रान गवा आला होता. पाणी पिण्यासाठी रानगवा आमच्या शेततळ्यात उतरला. पण परत जाताना शेततळ्याचा कागद फाटल्याने तळ्यातील पाणी जमिनीत मुरले व आमचे नुकसान झाले आहे.

उत्कर्ष कदम,शेतकरी सलगर बुद्रुक -

आमच्या द्राक्षबागेतील द्राक्ष घडांचे खूप नुकसान झाले आहे. तसेच द्राक्ष वेलीला आधार देण्यास आखलेल्या तारा व दगडी खांबाचे नुकसान झाले आहे. वन विभागाने पंचनामा करून मदत करावी.

भीमराव ठेंगील,वनरक्षक सलगर बुद्रुक -

सोलापूर जिल्ह्यात रान गव्याचा वावर तसा दुर्मिळच आहे. पण चुकून तो रानगवा भटकत सलगर च्या परिसरात आला होता. रान गव्यामुळे झालेल्या नुकसानीला फॉरेस्ट विभागाकढून नियमानुसार मदत केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com