मंगळवेढा - मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील 210 चारा छावण्याची प्रलंबित 33 कोटी 44 लाख 99 हजाराची देयके अद्याप अदा केली नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली. गेली सहा वर्षे बिलाच्या प्रतीक्षेत असलेल्या छावणी चालकाच्या थकीत बिलाला यंदा तरी विठ्ठल पावणार का? असा सूर या निमित्ताने उपस्थित होत आहे.