काही मिनिटातच उद्‌वस्त झाली द्राक्ष बाग 

solapur farmers
solapur farmers
Updated on

सोलापूर : तुम्ही कोणीही व्हा...पण शेतकरी होऊ नका. जेव्हा पिकते तेव्हा भाव मिळत नाही. जेव्हा शेतात नसते तेव्हा भाव वाढतो अशा विचित्र परिस्तिथीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. कधी निसर्गाचे संकट तर कधी प्रशासकीय अनास्था अशा वाईट स्थितीचा बळिराजाला नेहमीचा सामना करावा लागतो. कालपर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्षाच्या बागा काही मिनिटातच जमीनदोस्त झाल्या आहेत. मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, चांगले घर अशी बघितलेली अनेक स्वप्नं काही मिनिटातच मातीमोल झाली. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना शनिवारी सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसासोबत वाऱ्याचा वेग वाढल्याने द्राक्ष बागायदाराच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. 
हेही वाचा - दोन्ही हात नसताना बांधकाम कामगाराचा जगण्यासाठी संघर्ष सुरू 
शनिवारच्या अवकाळी पावसात सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, बार्शी तालुक्‍यातील द्राक्ष बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहर व परिसराच्या तापमानात सातत्याने वाढ होत होती. उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असे वाटत असतानाच शनिवारी रात्री अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यात हजेरी लावली. पावसासोबत वाऱ्याचा वेग वाढल्याने जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाच्यावतीने या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या ज्वारीचे पीक काढण्याचे काम सुरू आहे. हातातोंडाशी आलेला ज्वारीचे पीक शनिवारच्या अवकाळी पावसामुळे संकटात सापडले आहे. द्राक्षेही काढणीच्या स्थितीत असून अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. माढा तालुक्‍यातील अरण व मोहोळ तालुक्‍यातील नरखेड परिसरात असलेल्या द्राक्ष बागांना मोठा फटका वाऱ्यामुळे बसला असल्याचे समोर आले आहे. 
हेही वाचा - इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या विरोधात शेतकरी आक्रमक 
महसूल विभागाकडील माहितीनुसार शनिवारी रात्री उत्तर सोलापूर तालुक्‍यात 6 मिलिमीटर, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 2.36, बार्शी तालुक्‍यात 2.20, अक्कलकोट तालुक्‍यात 0.89, मोहोळ तालुक्‍यात 2.40, माढा तालुक्‍यात 1.54 मिलिमीटर आणि मंगळवेढा तालुक्‍यात 1.29 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. पंचनाम्याची आकडेवारी उद्या हाती येईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com