Omicron Update | बाजारभर विना मास्क वावर; तिसऱ्या लाटेचे नाही गांभीर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona And Omicron Update Marathi News
बाजारभर विना मास्क वावर; तिसऱ्या लाटेचे नाही गांभीर्य

Corona Update : बाजारभर विना मास्क वावर; तिसऱ्या लाटेचे नाही गांभीर्य

सोलापूर : कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येचा आलेख पुन्हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून (State government) नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून, मास्क नाही (No Mask) तर प्रवेश नाही अशा सूचना दिल्या असतानादेखील या सूचना केवळ फलकावरच पहायला मिळत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत दिसून आले. (Corona And Omicron Update Marathi News)

हेही वाचा: नागपूरच्या कॅबचालकाचा औरंगाबादेत निर्घृण खून

राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून नवे निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, याचे गांभीर्य सोलापूरकरांना दिसून येत नसल्याचे चित्र सध्या बाजारपेठ, मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असे फलक दुकाने, हॉटेल व आदी ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, या सूचनांचे पालन होताना दिसून येत नाही.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने जनजागृती करण्यासाठी मोठे फलक, बॅनर लावण्यात आले आहेत. हे वाचून प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, जेणेकरून कोरोना संसर्ग कमी होईल. परंतु त्याचे फारसे गांभीर्य घेताना कोणीच दिसत नाही. आपल्याला कोणी काय करणार या अविर्भावात नागरिकांचा मुक्‍त संचार शहरभर पहायला मिळत आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, नियमांचे पालन केले पाहिजे. तरच आपण कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर विजय मिळवून त्याला हरवू शकतो. म्हणून जागोजागी दुकानदार, हॉटेल चालक व इतर दुकानदार मास्क नाहीतर प्रवेश नाही, असे बॅनर लावण्यात आले आहेत. शासनाने वेळोवेळी दिलेले नियम आपणास पाळून ते अंमलात आणायचे आहेत. ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य देखील आहे. केवळ शासनाचा नियम आहे म्हणून नाही तर स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: सोलर पॅनल स्वच्छतेची चिंता नको, तरुणानं तयार केलीय भन्नाट यंत्रणा

मास्क वापराबद्दल जनजागृतीची गरज

शहरातील बाजारपेठ, मार्केट, सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचे नियमांना तिलांजली दिली जात आहे. त्याचबरोबर दुचाकीवरुन फिरणारे क्‍वचितच नागरिक मास्कचा वापर करीत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने नियम आणि दंड करुन कोरोना रोखणार नाही. कारण प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियमित पालन केले तर कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळू शकते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Solapur
loading image
go to top