सोलर पॅनल स्वच्छतेची चिंता नको, तरुणानं तयार केलीय भन्नाट यंत्रणा

solar panel
solar panele sakal

नागपूर : शाश्वत आणि प्रदूषणमुक्त ऊर्जेचा स्रोत म्हणून शासनाकडून सौर ऊर्जेला (solar energy) प्रोत्साहन दिले जात आहे. ‘रुफ टॉप सोलर' यंत्रणा चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. परंतु, सोलर पॅनलची (solar panel) नियमित स्वच्छता अडचणीची बाब ठरली आहे. शहरातील इलेक्ट्रॉनिक अभियंता अमेय बनसोड यांनी या समस्येवर ‘ऑटोमॅटिक सोलर पॅनल क्लिनिंग' (automatic solar panel cleaning) यंत्रणेचा तोडगा शोधला आहे. (engineer developed system to clean solar panel in nagpur)

solar panel
नागपुरी ‘ॲप’ करणार कॅनडातील वाहनांची स्पीड नियंत्रित

वर्षातील ३०० हून अधिक दिवस लख्ख सूर्यप्रकाश असल्याने भारतीय मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीकडे वळू लागले आहेत. सोलर पॅनल बाहेर बसविले जात असल्याने पक्ष्यांची विष्ठा, धुळ व अन्य कारणाने पॅनल्सची कार्यक्षमता २० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी होते. यामुळे पॅनलची नियमित स्वच्छता, देखभाल, त्रुटी दूर करावी लागते. त्यासाठी पूर्वी स्प्रिंकलींग सिस्टिम अस्तित्वात असली तरी कुणाला तरी त्यात गुंतून राहावे लागत होते. त्यातच पॅनल फार उंचीवर आणि उतरते असल्याने स्वच्छता करणे फारच जिकरीचे ठरते. अमेय बनसोड हेसुद्धा पूर्वी सोलर क्लिनिंग ब्रशेस तयार करायचे. पण, गतवर्षी लॉकडाउन लागले. ब्रश खरेदीसाठी घराबाहेर पडणे अडचणीचे होते. अमेय यांनी निकड हेरली. सामान्यांना परवडणारी स्वयंचलित यंत्रणा विकसित केली. त्याद्वारे कोणत्याही आकाराचे सोलर प्लॉट केवळ एका मिनिटात साफ होऊ शकते. ही यंत्रणा जगातील सर्वांत शक्तिशाली स्वच्छता स्प्रिंकलररपैकी एक आहे. या वैशिष्ट्य़ाच्या बळावर अल्पावधीत यंत्रणा लोकप्रिय ठरली. काही महिन्यातच देशभरात तब्बल सहा मेगावॅट क्षमतेचे सोलर पॅनल स्वच्छ करणाऱ्या यंत्रणेची उभारणी त्यांनी केली आहे.

नऊ महिन्यांत पेटंट -

या यंत्रणेतील स्प्रिंकलर फारच दमदार आहेत. त्याचे पेटंट विक्रमी नऊ महिन्यात मंजूर झाले आहे. झूम सोलर हे भारतातील एकमेव स्वयंचलित स्वच्छता उपकरण निर्माता असल्याचे मानले जाते.

मानवी हस्तक्षेप नाही -

ऑटोमॅटिक सोलर पॅनल क्लिनिंग यंत्रणेत सर्वात वर स्पिंकलर्स पॅनलवर बसविले असतात. खाली पंपाला जोडलेला पाईप असतो. पंपाचे टायमिंग पूर्वीच सेट केलेले असते. ठरल्या वेळेत ते सुरू होऊन अगदी एकाच मिनिटात पाण्याच्या मारा करण्यासह संपूर्ण धूळ व घाण ते स्वच्छ करते. ही यंत्रणा पूर्णतः स्वयंचलित आहे. यामुळे पाण्याची तर बचत होतेच पण देखभाल खर्चही वाचतो.

ऊर्जेचा शाश्वत पर्याय म्हणून सौर ऊर्जेला महत्त्व दिले जाऊ लागले आहे. पण, देखभाली अभावी वीजनिर्मितीवर परिणाम होतो. पॅनलची दर आठवड्यात स्वच्छता होणे अपेक्षित आहे. कंपन्यांकडून वॉरंटी देताना ही मूळ अट असते. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात ही यंत्रणा उपलब्ध करून देत असल्याचे समाधान आहे.
अमेय बनसोड, झूम सोलर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com