आमिषाला बळी पडलेल्या प्रवीणने दोन महिन्यात (३ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२५) दागिने मोडून, गहाण ठेवून, पैशांची जुळवाजुळव करून सहा लाख ४२ हजार ८७२ रुपये गुंतवले. पण, त्याला ना जादा रक्कम मिळाली ना गुंतवलेली रक्कम परत मिळाली.
Victim of investment fraud in shock after being duped of ₹6.5 lakh by a woman offering fake returns.Sakal
सोलापूर : येथील एकता नगरातील प्रवीण चंद्रकांत विभूते (वय ३६) या तरुणाला अनोळखी महिलेने जादा पैशाचे आमिष देऊन दोनच महिन्यात साडेसहा लाख रुपयाला फसविले आहे. त्याच्या फिर्यादीवरून महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.