मालट्रक व स्कुटी च्या अपघातात एका महीलेचा जागीच मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman died on the spot in truck and Scooty accident solapur

मालट्रक व स्कुटी च्या अपघातात एका महीलेचा जागीच मृत्यु

मोहोळ : भरधाव जाणाऱ्या ट्रकने एका स्कुटीला धडक देऊन झालेल्या अपघातात स्कुटी वरील 35 वर्षीय महिलेच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार ता 6 मे रोजी दुपारी अडीच वाजता मोहोळ ते कुरूल रोड लगत असलेल्या महावितरण कार्यालयासमोर घडली. जोत्स्ना नागनाथ सोनवणे वय 35 असे मृत महिलेचे नाव आहे.मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत जोत्स्ना यांचे कुरुल रस्त्यालगत सोनवणे टाइल्स या नावाने फरशी चे दुकान आहे. दुपारी अडीच वाजता मृत जोत्स्ना या स्कूटी क्रमांक एम एच 13 3439 वरून मोहोळ च्या दिशेने निघाल्या होत्या.

त्याच वेळी मालट्रक क्र टीएन 52 डी 6516 ही मोहोळ हुन कुरुल च्या दिशेने भरधाव निघाली होती. दोन्ही वाहने कुरुल रस्त्यालगत असलेल्या महावितरण कार्यालया समोर येताच मालट्रक ने स्कुटी ला रॉंग साईड ला जाऊन जोराची धडक दिली. त्यात जोत्स्ना या स्कुटी वरून खाली पडल्या, त्यांच्या डोक्यावरून मालट्रकचे चाक गेले. जोत्स्ना यांचा मेंदू बाहेर पडून हात पाय मोडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोहोळ येथील मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक नागनाथ सोनवणे यांच्या जोत्स्ना या कन्या होत. मृतदेह रुग्णालयात आणताच बघ्यांनी मोठे गर्दी केली. या अपघाताची फिर्याद प्रवीण नागनाथ सोनवणे यांनी पोलिसात दिली असून मालट्रक चा चालक विजयकांत तंगवेल रा नेकारणपटी पोस्ट आरूर जि नामकल याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत.

Web Title: Woman Died On The Spot In Truck And Scooty Accident Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top