
करमाळा : करमाळा येथे प्रसूतीदरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असून येथील विठ्ठल हॉस्पिटलचे डॉ. राम बिनवडे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश करमाळा न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार करमाळा पोलिस ठाण्यात डॉ. बिनवडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत असतानाच करमाळा येथे असेच प्रकरण घडले आहे.