सोलापूर : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेचा मारहाणीत मृत्यू

सोलापूर शहरातील घटना

woman was beaten to death.
woman was beaten to death.sakal

सोलापूर - शहरातील सेटलमेंट फ्री कॉलनीत पैशाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) घडली आहे. या प्रकरणी सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक अशोक काळे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित गव्हर्नर दगडू काळे, दत्ता विठ्ठल चव्हाण, किसन विठ्ठल चव्हाण हे सेटलमेंट कॉलनीत आले. त्यांनी पैशाच्या कारणावरून विनायक काळे यांच्या आई व पत्नीस शिवीगाळ केली. तेव्हा विनायक काळे हा संशयितांना जाब विचारू लागला. तेव्हा संशयितांनी त्यास मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी विनायक काळे यांची आई यशोदा काळे व बहीण सविता काळे या तेथे आल्या. तेव्हा किसन चव्हाण याने यशोदा काळे यांच्या मानेवर बुक्की मारली. तर इतरांनी पाठीत लाथ घालून खाली पाडले. तेव्हा या प्रकारात जखमी झालेल्या यशोदा काळे या बेशुध्द झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. मंद्रूपकर हे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com