Bike Accident : मोटर सायकलला मेंढी धडकून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू

मोटरसायकलला अचानक मेंढी आडवी येऊन धडकल्याने मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला.
mangal Chavare

mangal Chavare

sakal

Updated on: 

मोहोळ - मोटरसायकलला अचानक मेंढी आडवी येऊन धडकल्याने मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात मोहोळ- पंढरपूर- आळंदी पालखी महामार्गा वरील पेनुर शिवारातील माने वस्ती जवळ मंगळवार ता. 27 रोजी दुपारी 1.40 वाजता झाला. मंगल नवनाथ चवरे (वय-54) रा. पेनुर असे मृत महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com