
सोलापूर : तलाठी म्हणून नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तिघांनी एका महिलेकडून २६ लाख ६१ हजार रुपये घेतले. नोकरीत वशिलेबाजी चालत नसतानाही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या महिलेनेही वेळोवेळी पैसे दिले. आता नोकरीही नाही आणि पैसेही परत देत नसल्याने विवाहितेने विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली.