
सोलापूर ः कोरोना संकटात घरकामातून वेळ काढत ग्रामीण महिलांनी गाव सर्वेक्षण, गरजूंना मदत, रक्तदान अशा उपक्रमांतून सामाजिक मदत केली. तसेच पालेभाजी विक्री व मास्क निर्मितीच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध करण्याचे काम केले. लॉकडाउन काळात महिलांच्या अशा सेवा अखंड सुरूच होत्या.
लॉकडाउन काळात जिल्हाभरातील महिला बचत गटांचे कामकाज सामूहिक बैठक घेता न आल्याने थांबले. तरीही महिलांनी संकटात अनेक उपक्रम राबवले आहेत. बार्शी तालुक्यात बचत गटातील महिलांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा उपयोग करून वाहनाद्वारे खेड्यातून पालेभाजी गोळा केली. बार्शी शहरातील नागरिकांना रोज पालेभाजी विक्री केली. या महिलांनी रोज असे 40 दिवस पालेभाजी व फळे देण्याचे काम केले. यात वांगी, टोमॅटो, बटाटे, कांदे, पालक, कोथिंबीर, लिंबू कलिंगड, खरबूज आदींचा समावेश होता. सेवेतून लॉकडाउन काळात घरात अडकलेल्या नागरिकांना घरपोच पालेभाजी मिळाली. यात त्यांना मजुरीची रक्कम मिळाली. त्यासोबत महिलांनी मास्क तयार करण्याचे काम केले. एक लाखापेक्षा अधिक मास्कची निर्मिती करून त्याची विक्री करण्यात आली. महिलांनी शहर व ग्रामीण भागाची मास्कची गरज भागवण्यासाठी मोठा वाटा उचलला.
हेही वाचाः मुकेपणा निर्मुलन प्रकल्प आता आता ऑनलाईन
कोरोना संकटात गावपातळीवर समित्या नेमण्यात आल्या. या समित्यात बचत गट सदस्यांचा समावेश होता. गावपातळीवर होत असलेल्या सर्वेक्षण कामात त्या अग्रेसर होत्या.
जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असताना महिलांनी रक्तदान चळवळीत सहभाग घेतला. पूर्वी रक्तदान चळवळीत महिलांचा सहभाग अगदीच नगण्य असत. मात्र, कोरोना संकटात महिलांचा रक्तदानाचा आकडा वाढला आहे. त्यांचा उत्स्फूर्त सहभाग अन्य महिलांसाठी प्रेरणादायी बनला आहे. गावात एकाकी व्यक्ती व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यासाठी महिला बचत गटांनी गरजूंचा शोध घेऊन त्यांना मदत पोचवली. एक हजारपेक्षा अधिक गरजूंना अन्न व वस्तूंचे वाटप केले. आता तर शेतकऱ्यांना लागणाऱ्या बियाणे व खते पोचवण्यासाठी हे महिला गट नियोजन करु लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.