Solapur Accident: दोन पिकअपच्या अपघातात महिलेचा मृत्यू; १६ जखमी, विठ्ठल दर्शनासाठी जाताना जातेगाव-टेंभूर्णी रस्त्यावर घटना
Tragic Road Accident Near Tembhurni: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते. त्यांच्या पिकअप गाडीला समोरून येत असलेल्या दुसऱ्या पिकअप गाडीने समोरासमोर धडक दिली. त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
"Pickup vehicles collide on way to Vitthal Darshan; woman dead, 16 injured on Jategaon-Tembhurni road."Sakal
करमाळा: नाशिकवरून पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाताना पिकअपला समोरून येणाऱ्या दुसऱ्या पिकअपने धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले. जातेगाव-टेंभूर्णी रस्त्यावर ही घट शनिवारी सायंकाळी घडली.