
सोलापूर : कांदा विक्रीतून शेतकऱ्याला मिळालेले नऊ हजार रूपये लुटून नेलेल्या महिलेला फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले. तक्रार दाखल झाल्यानंतर दोन तासांत पोलिसांनी ही कारवाई केली. तिच्याकडून चोरीचे नऊ हजार रूपये हस्तगत केले. पार्वती दत्ता काळे (रा. भारतमाता नगर, होटगी रोड, सोलापूर) असे तिचे नाव आहे.