पोलिस असल्याचे सांगून महिलेचे दागिने लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Womans jewelery was robbed by claiming to be Police

पोलिस असल्याचे सांगून महिलेचे दागिने लुटले

सोलापूर - विजयपूर रोडवरील पत्रकार भवन ते सात रस्त्याकडे जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका महिलेला वाटेत अडविले. आम्ही पोलिस असल्याचे सांगत या परिसरात मोठी चोरी झाली आहे, पुढे पोलिस प्रत्येकाची तपासणी करीत असल्याचे त्यांनी त्या महिलेला सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून महिलेने त्यांनी सांगितल्याप्रमाणे गळ्यातील सोने काढून पांढऱ्या पुडीत ठेवले. पण, घरी गेल्यावर महिलेला समजले आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर सदर बझार पोलिसांत तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला.

दुचाकी सर्व्हिसिंगसाठी जाताना मंगला गोपाळ देशमुख (रा. दत्त नगर, जुळे सोलापूर) यांना पत्रकार भवनजवळ दोघांनी अडविले. पोलिस असल्याचे सांगून त्यांनी महिलेला गळ्यातील दागिने काढायला भाग पाडले. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने हे पोलिस असल्याचे सांगितल्याने मंगला यांना ते पोलिसच असल्याची खात्री वाटली. त्यानंतर एकाने परिसरात चोरी झाल्याने पुढे चेकिंग चालू असल्याचे सांगितले.

मंगला देशमुख यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून गळ्यातील दागिने त्या पुडीत ठेवले आणि ती पुडी त्यांच्या पर्समध्ये ठेवली. दुचाकी सर्व्हिसिंगला देऊन त्या घरी गेल्या. दागिने ठेवलेली पुडी त्यानी उघडली तर त्यात दागिने नव्हते. त्यानंतर तिघांकडून फसवणूक झाल्याची फिर्याद त्यांनी सदर बझार पोलिसांत दिली. पोलिस उपनिरीक्षक सचिन माळी तपास करीत आहेत. चोरट्यांनी चोरीचा नवा फंडा शोधल्याने नागरिकांमध्ये विशेषत: महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांसमोरही चोरट्यांनी नवे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज घेतले असून महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Womans Jewelery Was Robbed By Claiming To Be Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..