

Solapur Maharashtra Kesari
esakal
सोलापूर: निर्झरा केअर फाउंडेशनतर्फे २८ व २९ मार्च रोजी चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या मानाच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या महिला कुस्तीगिराला कार आणि मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उपविजेत्या खेळाडूला बुलेट बक्षीस म्हणून मिळणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते रविवारी हरिभाई देवकरण प्रशालेत वासा पूजन आणि माती पूजन करून या स्पर्धेच्या बक्षिसांचे अनावरण करण्यात आले.