

सोलापूर : महिलांची उन्नती ही राष्ट्राच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे. मात्र, महिला उद्धाराचे कार्य करत असल्याचा मोठेपणा पुरुषांनी बाळगू नये. पुरुषाकडे वात्सल्यगुणाची कमतरता असते. महिला जे काम करू शकतात ते पुरुष करू शकत नाहीत. त्यामुळे महिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करण्याची मोकळीक द्यावी. त्यासाठी त्यांना अनिष्ट रूढींच्या जोखडातून मुक्त करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. गुरुवारी (ता. १७) येथील हुतात्मा मंदिरात उद्योगवर्धिनी संस्थेला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित ‘परिवार उत्सव’ सोहळ्यात ते बोलत होते.