पोलिस आयुक्‍तांकडून भेट! महिला पोलिसांना आता आठ तासांचीच ड्यूटी

पोलिस दलात कर्तव्य बजावतानाच महिलांना कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते.
Women police
Women policeesakal
Summary

पोलिस दलात कर्तव्य बजावतानाच महिलांना कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते.

सोलापूर : शहर पोलिस आयुक्‍तालयातील महिला पोलिसांना (Women police) 12 तासांवरुन आता आठ तासांचीच ड्यूटी (Duty) मिळणार आहे. पोलिस आयुक्‍त हरिष बैजल (Harish Baijal)यांनी नववर्षानिमित्त महिला पोलिसांना तशी गूड न्यूज दिली आहे.

Women police
प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलिस ठाणे

पोलिस दलातील उपलब्ध मनुष्यबळ, कामाचे स्वरुप पाहून महिला पोलिसांना (Women police)आठ तासांची ड्यूटी देण्यासंदर्भात गृह विभागाने यापूर्वीच आदेश काढला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी नागपूर (Nagpur) शहरात त्यासंबंधीचा पहिला प्रयोग केला. त्यानंतर मुंबई (Mumbai), पुणे (Pune), अमरावतीसह (Amravati) काही शहर- ग्रामीणमध्ये त्याची अंमलबजावणी झाली. आता सोलापूर (Solapur)पोलिस आयुक्‍त बैजल यांनीही तसा निर्णय घेतला असून चार तासांची ड्यूटी कमी झाल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. पोलिस दलात कर्तव्य बजावतानाच महिलांना कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते. अनेकदा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्ह्यांची उकल करताना त्यांना 12 तासांपेक्षा अधिक ड्यूटी करावी लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर व कर्तव्यावर परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे महिला पोलिसांची ड्यूटी कमी करण्याचा निर्णय झाला. 1 जानेवारीपासून शहर पोलिस आयुक्‍तालयातील सर्वच महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आठ तासच ड्यूटी करावी लागत आहे. त्यात सात पोलिस ठाण्यातील 179 महिला पोलिस अंमलदारांसह वाहतूक शाखा, मुख्यालय, विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, महिला विशेष कक्ष, सुरक्षा शाखेतील महिला पोलिसांचाही समावेश आहे.

Women police
आपल्या हद्दीत पैसे का द्यायचे? महिला पोलिस अधिकाऱ्याचा Audio viral

यावेळी ड्यूटी करावीच लागेल

सोलापूर पोलिस आयुक्‍तांनी महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे बंदोबस्त (गणेशोत्सव, ईद, मोहरम, नवरात्र, ख्रिसमस, नववर्ष, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन) अशावेळी अतिरिक्‍त कर्तव्याची आवश्‍यकता भासते. यावेळी महिला पोलिसांना आठ तासांच्या ड्यूटीच्या आदेशावर बोट ठेवता येणार नाही. गरजेच्यावेळी आठ तासांपेक्षा अधिक काळ ड्यूटी करणे महिला पोलिसांना बंधनकारक असणार आहे.

ग्रामीणमध्येही काही दिवसांत निर्णय

ग्रामीण पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे. तरीही, उपलब्ध मनुष्यबळ, कामाचे स्वरुप या अनुषंगाने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी त्याचे नियोजन सुरु केले आहे. आगामी काळात त्यासंबंधीचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक सातपुते यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com