Womens Day Special : जिद्द, चिकाटी, मेहनत यामुळेच यशाचे शिखर गाठले

जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीमुळे राज्यसेवा वर्ग एकच्या परीक्षेत मुलीत प्रथम येण्याचा मान सुरेखा कांबळे यांनी पटकाविला आहे.
Surekha Kamble
Surekha KambleSakal
Summary

जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीमुळे राज्यसेवा वर्ग एकच्या परीक्षेत मुलीत प्रथम येण्याचा मान सुरेखा कांबळे यांनी पटकाविला आहे.

मोहोळ - जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीमुळे राज्यसेवा वर्ग एकच्या परीक्षेत मुलीत प्रथम येण्याचा मान सुरेखा कांबळे यांनी पटकाविला आहे.

यासाठी तिचे अशिक्षित आई-वडील, बहीण व एक भाऊ यांची मोठी प्रेरणा असल्यामुळेच या यशाला गवसणी घालता आले असल्याचे मत देवडी (ता. मोहोळ) येथील सुरेखा सौदागर कांबळे यांनी व्यक्त केले. सुरेखा या देवडी (ता. मोहोळ) येथील जनावराच्या बाजारात बैलांची शिंगे तासून घराचा गाडा चालविणाऱ्या सौदागर शंकर कांबळे यांची मुलगी. वडील अशिक्षित असूनही त्यांनी सुरेखा आणि दुसऱ्या मुलीला शिक्षणात काहीच कमी पडू दिले नाही. त्याचीच फलश्रुती म्हणजे त्यांच्या दोन मुली प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या आहेत. सुरेखा यांनी राज्यसेवेच्या परीक्षेत ‘एससी’ प्रवर्गात मुलीत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. या यशामुळे सुरेखावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुरेखा ही लहानपणा पासूनच शाळेत हुशार होती. देवडी व देवडी फाटा दरम्यान ‘अभिवंत वस्ती’ आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आहे. लहानपणी त्या शाळेत शिकल्यावर गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले, सातवी नंतरचे शिक्षण गावातील माध्यमिक प्रशालेत घेतले. मात्र, पदवीचे शिक्षण पुणे येथील कृषी महाविद्यालयात घेऊन ‘बी.एस्सी ॲग्री’ही पदवी प्राप्त केली.

सुरेखाने पहिली परीक्षा २०२० साली दिली. त्यातही प्रथम क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली व नायब तहसीलदारपदी निवड झाली. तोच आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तिचे नागपूर येथे प्रशिक्षण सुरू होते. यावेळी ते करत करतच २०२१ साली पुन्हा दुसरी परीक्षा दिली. त्यात वर्ग एकने ती उत्तीर्ण झाली. वर्ग एकमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा निबंधक, गटविकास अधिकारी हे विभाग येतात. माझ्या घरची गरीबी आहे, ग्रामीण भागातील जनतेचे काय हाल असतात हे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे चीज करून सर्वसामान्याला जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल हा विभाग निवडणार असल्याचे सुरेखा यांनी सांगितले.

Surekha Kamble
Womens Day Special : शेतीच्या बांधावर फुलविला साहित्याचा मळा

कुटुंबाची साथ हेच यशाचे गमक

आई-वडील दोघेही अशिक्षित. फक्त सहा एकर कोरडवाहू शेती. मात्र वडिलांनी एवढ्या अडचणीतून आमच्या शिक्षणाला पैसे कमी पडू दिले नाहीत. त्यामुळे या दोघांची प्रेरणा भाऊ विशाल याची साथ यामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.

‘मी ॲग्रोवनची वाचक’

माझे क्षेत्र हे कृषी असल्यामुळे तसेच कृषी क्षेत्रातील मी पदवीधर असल्याने ‘ॲग्रोवन’मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून व त्यांनी घेतलेले उत्पादन या पासूनच मला बीएस्सी ॲग्री होण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com