ऑगस्टअखेर पहिल्या उड्डाणपुलाचा मुहूर्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Work of Phase 1 flyover will actually start end of August Solapur

ऑगस्टअखेर पहिल्या उड्डाणपुलाचा मुहूर्त!

सोलापूर - जुना पूना नाका ते पत्रकार भवन या फेज १ उड्डाणपुलामध्ये बाधित होणाऱ्या जमिनींचे व बांधकामांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे, परंतु बाजारमूल्य निश्चित झाले नाही. येत्या ऑगस्टअखेर फेज १ उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. या मार्गातील बाधित १३७ मिळकतींच्या जमिनींचे मूल्य साधारण ८९ कोटी इतकी आहे. जमिनी आणि इमारती अशी दोन्ही उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी साधारण २०० कोटींची गरज आहे.

जुना पूना नाका ते पत्रकार भवन या उड्डाणपूल मार्गावर बाधित होणाऱ्या एकूण १३७ मिळकती आहेत. या सर्व मिळकतींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजणी होऊन मूल्यांकन पूर्ण करण्यात आले. आता नगररचना विभागाकडून अंतिम मूल्यांकन केले जात आहे. १३७ पैकी ११७ मिळकती बाधित होणार आहेत. या ११७ मिळकतींमध्ये ७३ मिळकतींवर बांधकामे आहेत तर उर्वरित खुल्या आहेत.

बाधित मिळकतींमध्ये हॉटेल, हॉस्पिटल, चाळ अशा व्यावसायिक मिळकतींची संख्या मोठी आहे. यात बांधकाम परवाना व कागदपत्रांच्या अपुऱ्या माहितीमुळे मूल्यांकनात अडचणी येत होत्या. परंतु संबंधित मिळकतदारांनी जागेवर नियमानुसार बांधकाम केले आहे का, याच्या तपासणीसाठी बांधकाम परवानगी आणि वीजबिल पावती आदी कागदपत्रे सादर करावीत, अशी नोटीस बजाविण्यात आली आहे. यात १३७ बाधित मिळकतींच्या जागेचे बाजारमूल्य ८९ कोटी इतके आहे. याशिवाय बांधकामाचे मूल्यांकन अद्याप निश्चित करण्यात आले नाही.

फेज २ मधील जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन मार्गावर ८८ मिळकती बाधित होणार आहेत. येथील बाधित मिळकतींच्या जागेची किंमत ५५ कोटी इतकी आहे. यामध्ये शासकीय जमिनी अधिक असून ४९ मिळकती बाधित होणार आहेत. यात शासकीय इमारतींचे मूल्यांकन करून शासनास टीडीआर किंवा आरसीसी देण्याचा विचार महापालिकेच्या वतीने सुरू आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी भूसंपादन कार्यालयाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. फेज १ मधील मूल्यांकनाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित किरकोळ अडचणी दूर केले जात आहेत. दुसऱ्या उड्डाणपुलाचे मूल्यांकनही सुरू आहे. त्यामुळे बाधित मिळकतींच्या जमिनींचे मूल्यांकन काढण्यात आले असून, बांधकामाचे मूल्यांकन अद्याप काढले नसल्याने भूसंपादनाची रक्कम निश्चित सांगता येणार नाही.

- पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका.

Web Title: Work Of Phase 1 Flyover Will Actually Start End Of August Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..