आमदारांच्या शब्दाला नाही किंमत! 'उत्तर'च्या रस्त्याची कामे निकृष्ट

कामाची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांना नाही वेळ
wadala padsali road
wadala padsali roadesakal
Summary

कामाची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांना नाही वेळ

उत्तर सोलापूर (सोलापूर) : मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने (MLA Yashwant Mane) यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता राखण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला (Department of Public Works) दिले आहेत. मात्र आमदारांनी दिलेल्या आदेशाची किंमतच बांधकाम विभागाने ठेवलेली नाही. तालुक्यात वडाळा- पडसाळी या रस्त्याचे (wadala padsali road) काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. पण त्या कामाची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही.

wadala padsali road
सोलापूर : उत्तर सोलापूरच्या सभापती भडकुंबे विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर

उत्तर सोलापूर तालुक्यांची तीन विधानसभा मतदार संघात विभागणी झाली आहे. 24 गावे मोहोळ विधानसभा मतदार संघाला, दहा गावे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाला तर दोन गावे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख व मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांनी रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता राखण्याबाबत असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला (Department of Public Works) दिले आहेत. मात्र आमदारांनी दिलेल्या या आदेशाला न जुमानता निकृष्ट दर्जाच्या कामाची मालिका सुरूच आहे. वडाळा पडसाळी या रस्त्याच्या कामाच्या संदर्भातील फोटो संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविले होते. मात्र त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे नूतन अधीक्षक अभियंता संजय माळी यांनाही वडाळा पडसाळी या रस्त्याच्या निकृष्ट होत असलेल्या कामाचे फोटो पाठविले आहेत. मात्र त्यांनाही याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. या रस्त्याचे काम अद्यापही निकृष्ट दर्जाचे होत आहे. आमदार माने यांनी सर्व ठेकेदार व अधिकाऱ्यांची नुकतीच सोलापूर येथे बैठक घेतली. मग ती बैठक केवळ दिखावा होती काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या कामाचे फोटो आमदार यशवंत माने यांनाही पाठविले आहेत. त्यांनी त्याची दखल घेतली नसल्याचे निकृष्ट होत असलेल्या कामावर स्पष्ट होते. उत्तर सोलापूर तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता रोहित जेऊरकर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

wadala padsali road
सोलापूर विभागातर्फे विशेष रेल्वे गाड्या, उत्तर-दक्षिणेतील प्रवाशांची सोय

बैठकीचा फार्स कशासाठी

उत्तर सोलापूर तालुक्यात प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा सबळ पुरावा देऊनही केवळ बैठक घेण्याचा फार्स आमदार माने यांनी कशासाठी केला. बैठक घेऊनही जर कामे निकृष्ट दर्जाची होत असतील तर ती बैठक घेण्याला काही 'अर्थ॑' आहे काय? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. बैठक घेऊनही जर अधिकारी निकृष्ट दर्जाची कामे करत असतील तर त्यामध्ये काहीतरी गुपित लपले असल्याचे स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com