सोलापूर : कर्मचारी संपामुळे अडकले पीएच.डी. प्रवेश

विद्यापीठ प्रशासनाचे तोंडावर बोट; ७९५ उमेदवारांना प्रतीक्षा
सोलापूर : कर्मचारी संपामुळे अडकले पीएच.डी. प्रवेश

सोलापूर : विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले असून आज त्याचा सातवा दिवस आहे. परंतु, अजूनही शासनाकडून त्यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षांबरोबरच(semister exam) पीएचडी प्रवेशाची प्रक्रियादेखील ठप्प झाली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरीही पीएचडीच्या उमेदवारांना(PHD candidates) प्रवेश मिळालेला नाही.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने(solapur university) विविध विषयांच्या ७९५ जागांसाठी ’पेट’ घेतली. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिध्द करून पात्र उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या. गुणवत्ता यादीतील त्रुटींमुळे विद्यापीठाने एसटी संपाचे कारण पुढे करून दोनदा मुलाखती पुढे ढकलल्याची चर्चा त्यावेळी रंगली. विद्यापीठाने ऑफलाइन व ऑनलाइन स्वरुपात मुलाखतीही घेतल्या. मात्र, त्यानंतर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. तेवढ्यात आता सातवा वेतन आयोग लागू करा, मागील थकबाकी द्या, पाच दिवसांचा आठवडा करा, अशा विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनाचा विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा, पीएचडीचे प्रवेशाचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.

सोलापूर : कर्मचारी संपामुळे अडकले पीएच.डी. प्रवेश
ठाणे : परदेशातून ठाण्यात परतलेले दोन हजार प्रवासी ‘नॉट रिचेबल’

२५० मार्गदर्शकांवर ७९५ उमेवारांचा भार

विद्यापीठाअंतर्गत पीएचडी उमेदवारांसाठी जवळपास २५० मार्गदर्शक (गाईड) आहेत. पाच वर्षे अध्यापनाचा अनुभव आणि पीएचडीची पदवी घेऊन दोन वर्षे झालेल्यांची गाईड म्हणून निवड केली जाते. प्राध्यापक म्हणून सेवेत असलेल्यांकडे आठ तर सहयोगी प्राध्यापकांकडे सहा आणि असिस्टंट प्राध्यापकांकडे चार विद्यार्थ्यांची जबाबदारी दिली जाते. विद्यापीठाने यंदा प्रथमच ७९५ जागांसाठी जाहीरात काढली आणि मुलाखती घेतल्या. त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्या अडीचशे प्राध्यापकांवर सोपविली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी डॉ. विकास कदम यांनी दिली. काही दिवसांत त्यांचे प्रवेश निश्‍चित होतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com