

A Legacy of Four Decades: Wrestling Tradition Alive in Mangalwedha
Sakal
मंगळवेढा : अलीकडच्या काळात पारंपारिक खेळाकडे दुर्लक्ष होत असताना तरुणाईचे लक्ष परदेशी खेळाबरोबर मोबाईलकडे लागले आहे. अशा परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यातील तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी कुस्तीच्या माध्यमातून आपली शरीर संपदा सुदृढ ठेवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी गेली 40 वर्षापासून सुरू असलेली कुस्तीची परंपरा पैलवान मारुती वाकडे यांनी जय मल्हार क्रीडा मंडळाच्या वतीने जोपासली.