पुण्यात एमबीए अन्‌ स्टार्ट-अप सोलापुरात !

पुण्यात एमबीए अन्‌ स्टार्ट-अप सोलापुरात !
पुण्यात एमबीए अन्‌ स्टार्ट-अप सोलापुरात !
पुण्यात एमबीए अन्‌ स्टार्ट-अप सोलापुरात !Canva
Summary

यशोधन वेणेगूरकर हा मूळचा सोलापूरचा. सोलापुरात शिक्षण घेतल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेला...

सोलापूर : पुण्यात (Pune) एमबीए (MBA) केल्यानंतर पुण्याचे आकर्षण सोडून सोलापुरात (Solapur) परत आल्यावर चक्क गीर गाईच्या डेअरी (Dairy) फार्म व्यवसायाचा स्टार्ट-अप करत यशोधन वेणेगूरकर (Yashodhan Yenegurkar) याने वेगळ्या पद्धतीने कामगिरी केली आहे. यशोधन वेणेगूरकर हा मूळचा सोलापूरचा रहिवासी. सोलापुरात शिक्षण घेतल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेला. पुण्यात हैदराबादच्या व्यवस्थापन शिक्षणाच्या (Management education) पुणे शाखेत त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अर्थात पुण्यात त्याच्यासमोर करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या होत्या. नोकरी किंवा व्यवसाय या दोन्हींसाठी एक चांगली संधी पुण्यात होती. पण त्याने पुण्याऐवजी सोलापूरची निवड केली.

पुण्यात एमबीए अन्‌ स्टार्ट-अप सोलापुरात !
दिराचाच वहिनीवर अत्याचार! तरुणीचा विनयभंग; आठजणांविरुद्ध गुन्हा

प्रत्येकाला सकाळी चांगल्या प्रतीचे नैसर्गिक व भेसळ नसलेले दूध मिळणे ही एक मोठी गरज असते. त्यासाठी ग्राहक हवे तेवढे पैसे देण्यास तयार असतात. पण त्याला त्या दर्जाच्या दुधाचा पुरवठा सातत्याने करण्याची गरज यशोधनने ओळखली. अनेक वेळा भुकटीचे दूध देखील बाजारात पाहण्यास मिळते. मग आपण ग्राहकांना खात्रीशीर दूध देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा विचार करत त्याने डेअरीची तयारी सुरू केली. काही वर्षांपूर्वी त्याच्याकडे म्हशीच्या दुधाची डेअरी होती. नंतरच्या काळात ती डेअरी बंद झाली. पण बदलत्या काळात पुन्हा एकदा सकस व शुद्ध दुधाची गरज बाजारात कितीतरी वाढली आहे, ही स्थिती लक्षात घेत त्याने त्याच ठिकाणी डेअरी सुरू करण्याचे ठरवले.

पुण्यात एमबीए अन्‌ स्टार्ट-अप सोलापुरात !
विद्यार्थिनींना उपस्थिती भत्त्यापोटी मिळणार दररोज पाच रुपये

सकसता व शुद्धता या निकषावर त्याने म्हशीऐवजी गायीच्या दुधाची डेअरी सुरू करण्याचे ठरवले. गीर गाईच्या दुधाची सध्याची वाढती मागणी व ट्रेंड अगदी जोरात आहे. त्यामध्ये गोवंशाची शुद्धता जपण्याची गरज म्हणून त्याने गीर वळू देखील याच गोवंशातून वाढवला. त्याच्या डेअरीच्या दुधाला चांगली मागणी आहे. पण गोवंशाची पैदास होईल, त्याप्रमाणे दुधाचा पुरवठा करण्याचे त्याने ठरवले आहे. त्यामुळे डेअरीचा व्यवसाय संथगतीने होईल, पण मूळ गोवंश कायम राहील, असा प्रयत्न त्याने केला आहे.

पुण्यात संधी अनेक असल्या तरी आपल्या गावात त्याहीपेक्षा अधिक योग्य पद्धतीने आपण स्टार्ट-अप करू शकतो, हे लक्षात घेऊन सोलापुरातच गीर गाईच्या दुधाची डेअरी सुरू केली.

- यशोधन वेणेगूरकर, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com