
Yashwant Mane : वेगळ्या "हेड" ची निर्मिती करून प्रत्येक आमदाराला 50 कोटी द्या; यशवंत माने
मोहोळ :अतिवृष्टी व गौण खनिजांच्या जड वाहतुकीमुळे मोहोळ विधानसभा मतदार संघातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे, दळणवळण हे प्रगतीचे साधन आहे,
रस्त्याच्या कामासाठी वेगळ्या "हेड" ची निर्मिती करावी व दुजा भाव न करता प्रत्येक आमदाराला किमान 50 कोटीचा निधी द्यावा अशी मागणी मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी अधिवेशनात केली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोहोळ विधानसभा मतदार संघात पंढरपूर, उत्तर सोलापुरातील काही गावांचा समावेश आहे. मोहोळ मधील 1031 किलोमीटर, उत्तर सोलापूर मधील 280 किलोमीटर तर पंढरपूर मधील 123 किलोमीटर एकूण 1434 किलोमीटरचे रस्ते दुरुस्त होणे गरजेचे आहे.
तुटपुंज्या निधीमुळे वर्षाला केवळ 40 ते 45 किलोमीटर पेक्षा जादा रस्त्याची बांधणी होत नाही. अशा पद्धतीने कामे झाली तर किमान 29 ते 30 वर्षे रस्त्यांच्या कामा साठी कालावधी लागणार आहे., तो पर्यंत केलेले रस्ते उघडले जातात.
सत्ताधारी आमदारांना अर्थ संकल्पात 25 व मार्चच्या बजेटमध्ये 25 असे एकूण 50 कोटी रुपयांचा विकास निधी दिला गेला. तर विरोधी आमदारांना अत्यंत कमी निधी दिला गेला. असा तुझा भाव कशासाठी?
असा प्रश्न आमदार माने यांनी उपस्थित केला. अधिवेशनात रस्ते कामासाठी वेगळ्या हेड ची निर्मिती करावी व प्रत्येक आमदाराला तो विरोधी असेल किंवा सत्ताधारी असेल त्याला किमान 50 कोटीचा निधी द्यावा. आमदार हा सर्वसामान्याच्या सेवेसाठी असतो. ग्रामीण भागातील जनतेला तसेच
शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर जनतेने ग्रामीण भागात जन्म घेऊन चूक केली आहे का? अनेक भागातील रस्त्यावर स्वातंत्र्या पासून साधी खडी पडली नाही. अशी अवस्था पूर्ण महाराष्ट्रातच आहे.
मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील पुलासाठी अनेक वेळा मागणी केली होती कारण नदीला पाणी आले तर त्या गावचा संपर्क तुटतो. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2021 मध्ये मुख्य सचिवाकडे या मागणीसाठी शिफारस करून पुला ला मंजुरी देण्याची सूचना दिली
या घटनेस 14 महिने झाले, पण त्यावर अद्याप काहीच हालचाल झाली नाही. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली एवढ्या कालावधीत जर रस्त्यावर खडी पडत नसेल तर आम्हाला मतदार संघात गेल्यावर नागरिक हिनवितात. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागालाही समान निधी द्यावा अशी मागणी आमदार माने यांनी यावेळी केली.