

Faith at Its Peak: Pandharpur Sees Huge Turnout on Putrada Ekadashi
Sakal
पंढरपूर: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवारी (ता. ३१) राज्यभरातून आलेल्या सुमारे दोन लाख भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती. त्यातच पुत्रदा एकादशीचा योग आल्याने भाविकांच्या आनंदाला उधाण आले होते. विठ्ठल मंदिर परिसरासह शहरातील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. चंद्रभागेच्या काठीही भाविकांची गर्दी झाली होती.