Solapur Crime: 'यलमार मंगेवाडी येथील तरुणाला काठीने मारहाण'; सांगोला पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
Violent Clash in Solapur: संशयित आरोपी वैभव जाधव (रा. पानीव, ता. माळशिरस) याने फोन करून जुन्या भांडणाचे निवारण करण्यासाठी बोलावले होते. फिर्यादी, त्यांचे वडील तानाजी मदने, भाऊ तुकाराम व नातेवाईक धनाजी जाधव हे घटनास्थळी पोचले असता वैभव जाधव, विशाल चव्हाण यांनी काठी व कोयत्याने हल्ला करून मारहाण केली.
सांगोला : सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे शनिवारी (ता. १३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात चारजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगोला पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.