esakal | तरुणाची फेसबूवर झाली अल्पवयीन मुलीशी मैत्री ! पाच महिन्यानंतर 'असे' केल्यावर मुलगी पोहचली पोलिस ठाण्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

1facebook_8.jpg

पोलिस फिर्यादीनुसार... 

 • शहरातील अल्पवयीन मुलीशी 20 वर्षीय साकीब कुरेशीने केली फेसबूकवरुन ओळख 
 • पाच- सहा महिन्यात वाढविली जवळीकता; चहा वगैरच्या निमित्ताने सुरु झाले दोघांचे भेटणे 
 • 4 जानेवारीला साकीबने त्या मुलीला पिक्‍चर पाहण्याच्या निमित्ताने दुचाकीवरुन बसविले 
 • पिक्‍चर पाहायला न जाता शाकीबने मुलीला जुळे सोलापुरातील एका घरात नेऊन केला अत्याचाराचा प्रयत्न 
 • साकीबच्या ओळखीतील 45 वर्षीय विनय कुलकर्णी यांनी केली साकीबला मदत 
 • मुलगी अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असतानाही साकीबने केला अत्याचाराचा प्रयत्न 

तरुणाची फेसबूवर झाली अल्पवयीन मुलीशी मैत्री ! पाच महिन्यानंतर 'असे' केल्यावर मुलगी पोहचली पोलिस ठाण्यात 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील साकीब शाकीर कुरेशी (वय 20) याने पाच- सहा महिन्यांपूर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीस फेसबूकवरुन फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविली. त्या मुलीने ती रिक्‍वेस्ट ऍक्‍सेप्ट केली. दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले आणि त्याचे रुपांतर ओळखीत झाले. ओळख वाढू लागल्यानंतर दोघांनी भेटायला सुरु केले. चहासह अन्य कारणानिमित्ताने त्यांच्या भेटीगाठी सुरुच होत्या. परंतु, 4 जानेवारीला साकीबने त्या मुलीला पिक्‍चर पाहण्याचे अमिष दाखवून दुचाकीवर बसविले आणि जुळे सोलापुरातील एका घरात नेले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने आई- वडिलांसह पोलिस ठाणे गाठले आणि विजापूर नाका पोलिसांत साकीब आणि त्याला मदत करणाऱ्या विनय कुलकर्णी (वय 45) यांच्याविरुध्द तक्रार दिली.

पोलिस फिर्यादीनुसार... 

 • शहरातील अल्पवयीन मुलीशी 20 वर्षीय साकीब कुरेशीने केली फेसबूकवरुन ओळख 
 • पाच- सहा महिन्यात वाढविली जवळीकता; चहा वगैरच्या निमित्ताने सुरु झाले दोघांचे भेटणे 
 • 4 जानेवारीला साकीबने त्या मुलीला पिक्‍चर पाहण्याच्या निमित्ताने दुचाकीवरुन बसविले 
 • पिक्‍चर पाहायला न जाता शाकीबने मुलीला जुळे सोलापुरातील एका घरात नेऊन केला अत्याचाराचा प्रयत्न 
 • साकीबच्या ओळखीतील 45 वर्षीय विनय कुलकर्णी यांनी केली साकीबला मदत 
 • मुलगी अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असतानाही साकीबने केला अत्याचाराचा प्रयत्न 

संशयित आरोपींविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. प्रिती टिपरे या करीत असून दोघांनाही पोलिसांनी अट केली आहे. तत्पूर्वी, या घटनेत सहा साक्षीदारांकडे तपास केला असून गुन्ह्यात वापरलेले मोबाइल, दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या घटनेचा तपास पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदसिंह पाटील, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी मस्के, पोलिस नाईक शावरसिध्द नरोटे, सचिन सुरवसे, दादाराव इंगळे, दिपक चव्हाण, रोहन ढावरे, कृष्णात जाधव, रमेश सोनटक्‍के, विक्रांत कोकणे यांनी या घटनेचा तपास केला.

loading image