
सोलापूर : भूम (जि. धाराशिव) तालुक्यातील पाभ्रुड येथील १८ वर्षीय तरुणास प्रेम प्रकरणातून सात ते आठ जणांनी लोखंडी रॉड व काठी आणि धारधार हत्याराने मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाचा सोलापुरातील नामांकित सहकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. माऊली बाबासाहेब गिरी असे त्या तरुणाचे नाव आहे.