Solapur Crime: साेलापूरात ‘एटीएम’मध्ये पैसे भरताना तरुणाला मारहाण; सातरस्ता परिसरातील एटीएममधील प्रकार, सीसीटीव्हीवरून शोध!

ATM security issues and crime cases India: एटीएममध्ये पैसे भरताना किरकोळ वादातून तरुणावर सात-आठ जणांचा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
CCTV Leads Probe After Youth Assaulted at ATM in Solapur

CCTV Leads Probe After Youth Assaulted at ATM in Solapur

sakal

Updated on

सोलापूर : सात रस्ता परिसरातील ‘एटीएम’मधून पैसे पाठवत असताना वाद झाला आणि सात-आठ जणांनी तेथील एका तरुणास मारहाण केली. यात समीर इनामदार (रा. सोलापूर) या तरुणाच्या डोक्याला जखम झाली असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com