Youth Create Boat Using Water Storage Drum
sakal
माढा - पूरग्रस्तांच्या मनातील सर्जनशीलता जागृत होऊन महापुरासारख्या कठीण प्रतिकूल परिस्थितीत एका नव्या शोधाने अथवा जुगाडाने जन्म घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीकाठी मागील १६ दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर शेकडो लोक निवारा केंद्रात स्थलांतरित झालेले आहेत. मात्र अनेक गावांतील व वाड्या वस्त्यांवर जनावरे आहेत. अशातच दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे.