
-प्रमोद बोडके
सोलापूर:राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांची प्रारूप प्रभागरचना सध्या अंतिम टप्प्यावर आहे. येत्या १८ ऑगस्टला ही प्रभागरचना अंतिम होणार आहे. यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र व पंचायत समित्यांसाठी स्वतंत्र बॅलेट युनिट वापरण्यात आले होते. आता २०२५ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे एकाच बॅलेट युनिटवर असण्याची शक्यता आहे. तशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने त्या-त्या जिल्हा प्रशासनाला दिल्याचेही समजते.