सोलापूरची वॉलहॅंगिंग कला अद्वितीय! 

श्रीनिवास दुध्याल 
रविवार, 22 डिसेंबर 2019

विद्यार्थ्यांनी हातमागावर वॉलहॅंगिंगचे काम कसे होते, हातमाग व वॉलहॅंगिंगचा सोलापुरातील इतिहास, या कलेला जागतिक स्तरावर काय मागणी आहे, तसेच याचे प्रशिक्षण सोलापुरात दिले जाते का, हातमाग कामगार किती आहेत, असे अनेक प्रश्‍न प्रा. चन्ना व श्री. अंकम यांना विचारले. त्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे त्यांना मिळाली.

सोलापूर : सोलापूरमधील हातमागावरील विविध उत्पादने अप्रतिम असतात. वाढत्या यंत्रमागांमुळे हातमागावरील उत्पादने कमी झाली आहेत. मात्र, "ईसकाळ'वरील "वॉलहॅंगिंगची कला पोचणार सातासमुद्रापार' ही बातमी वाचली. हातमागाविषयी अभ्यास करण्यासाठी आम्ही सोलापूरला आलो व येथील वॉलहॅंगिंगची कला व त्यातील प्रकार पाहिले. ही कला जगात कुठेच सापडणार नाही, अद्वितीय अशी ही कला आहे, असे उद्‌गार राष्ट्रीय फॅशन प्रौद्योगिक संस्था (एनआयएफटी), मुंबईच्या मास्टर ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी काढले. 

हेही वाचा : नामुष्की...! सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपचा प्रस्ताव फेटाळला 

"सकाळ', "ईसकाळ'ची बातमी अमेरिकेपर्यंत व्हायरल 
येथील प्रा. गणेश चन्ना यांना दिल्ली येथील जागतिक दहशतवाद विरोधी मंचतर्फे अमेरिकेत जानेवारी 2020 मध्ये होणाऱ्या चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. चर्चासत्रास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार आहेत. प्रा. चन्ना हे ट्रम्प यांना त्यांचा पोर्ट्रेट भेट देणार आहेत. हा पोर्ट्रेट प्रा. चन्ना यांनी येथील वॉलहॅंगिंग विणकर राजेंद्र अंकम यांच्याकडून बनवून घेतला आहे. याबाबत "सकाळ' व "ईसकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी अमेरिकेपर्यंत व्हायरल झाली. "डोनाल्ड ट्रम्प अँड फ्रेंड्‌स'च्या फेसबुक पेजवरूनही बातमी व व्हिडिओ व्हायरल झाला. 

हेही वाचा : धक्कादायक... "या' शहरात सर्वाधिक मद्यपी वाहनचालक 

हातमाग व्यवसायाची घेतली माहिती 
"सकाळ ईपेपर' व "ईसकाळ'वरील वॉलहॅंगिंगची बातमी व व्हिडिओ पाहून एनआयएफटी, मुंबईच्या मास्टर ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी क्राफ्ट क्‍लस्टर अभ्यासासाठी सोलापूरला भेट दिली. सोलापूर विद्यापीठातील हातमाग अभ्यासक्रम विभागाला भेट देऊन येथील हातमाग व्यवसायाची माहिती घेतली. "सकाळ' बातमीतील वॉलहॅंगिंग कलाकाराचा शोध घेत विद्यार्थ्यांनी प्रा. चन्ना यांच्याशी संपर्क साधला. प्रा. चन्ना यांनी श्री. अंकम यांच्या हातमाग कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

हेही वाचा : धक्कादायक... "या' शहरातील कोचिंग क्‍लासेसमधील विद्यार्थी असुरक्षित! 

विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा होता सहभाग 
विद्यार्थ्यांनी हातमागावर वॉलहॅंगिंगचे काम कसे होते, हातमाग व वॉलहॅंगिंगचा सोलापुरातील इतिहास, या कलेला जागतिक स्तरावर काय मागणी आहे, तसेच याचे प्रशिक्षण सोलापुरात दिले जाते का, हातमाग कामगार किती आहेत, असे अनेक प्रश्‍न प्रा. चन्ना व श्री. अंकम यांना विचारले. त्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे त्यांना मिळाली. या विद्यार्थ्यांमध्ये रिचा पाल (दिल्ली), मोना कुमारी (उत्तर प्रदेश), मनिशिका त्रिखा (हरिद्वार), प्रजीना शेरपा (पश्‍चिम बंगाल), शक्ती राय (भोपाळ), सुरभी (लखनौ) आणि आदित्य रत्नपारखी (नांदेड, महाराष्ट्र) यांचा सहभाग होता. 

अद्वितीय असा कला प्रकार 
"सकाळ ईपेपर', "ईसकाळ'वरील वॉलहॅंगिंगची बातमी वाचून सोलापूरला भेट दिली. येथील हातमागासह वॉलहॅंगिंग कलेबाबत कलाकारांना भेटून जुने व नवीन हातमागांची माहिती घेतली. हातमागावरील प्रत्यक्ष विणकाम व वॉलहॅंगिंगमधील विविध प्रकार पाहिले. ही कला जगात कुठेच दिसून येत नाही. अद्वितीय असा कला प्रकार आहे. सोलापूर भेटीत आम्हाला हातमागाविषयी खूप चांगली माहिती मिळाली. 
- आदित्य रत्नपारखी, विद्यार्थी, एनआयएफटी, मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapurs unique wall hanging art