नामुष्की...! सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपचा प्रस्ताव फेटाळला 

नामुष्की...! सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपचा प्रस्ताव फेटाळला 
Updated on

सोलापूर ः सर्वाधिक नगरसेवकांमुळे सत्ता मिळवलेल्या भाजपला पक्षाच्या नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे नामुष्कीला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी लोकवर्गणीतून करून घेण्याची विरोधकांची सूचना बहुमताने मंजूर करावी लागली. या विषयावेळी सभागृहात भाजपच्या तुलनेत विरोधकांची संख्या जास्त होती, त्याचा फटका भाजपला बसला. या संदर्भात सभागृह नेते श्रीनिवास करली यांच्याशी संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. 

हा होता प्रस्ताव 
राष्ट्‌पुरुष व थोर व्यक्ती पुरुष यांचे पुतळे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देता येणार नाही, असा आदेश शासनाने 2017 रोजी काढला आहे. पुतळा उभारण्यासाठी लोकवर्गणीतून कार्यवाही करावी, असे या आदेशात म्हटले आहे. हा आदेश म्हणजे राष्ट्रपुरुष व महापुरुष यांना संकुचित करण्याचा व दाबण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. देशाला व महाराष्ट्राला दिशा व प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा बसवेश्‍वर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी योगदान दिले आहे. त्यांचे पुतळे लोकवर्गणीतून उभारणे हे योग्य नाही. लोकवर्गणी देणारे नागरीक हे विविध कराच्या रुपाने शासनाकडे कर भरत असतातच. त्यामुळे शासनाच्या निधीतूनच पुतळे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि 2 मे 2017 चा शासन निर्णय रद्द करावा, अशी शिफारस राज्य शासनाकडे करावी, असा प्रस्ताव सभेकडे पाठविण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, ज्योती बमगुंडे, कॉंग्रेसचे चेतन नरोटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किसन जाधव, एमआयएमचे रियाज खरादी, शिवसेनेचे विठ्ठल कोटा व विनायक कोंड्याल आणि भाजपचे सुर्यकांत पाटील यांनी दिला होता. 

अशी सूचना व उपसूचना 
हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी सूचना प्रस्तावकांतर्फे मांडण्यात आली, तर राज्य शासनाचा निर्णय योग्य असून, हा विषय दफ्तरी दाखल करावा, अशी उपसूचना सत्ताधारी भाजपचे सभागृहनेते श्रीनिवास करली यांनी मांडली. त्यावेळी सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या मोठी होती, तर भाजपचे नगरसेवक कमी होते. मात्र बहुमताने सूचना मंजूर झाल्याची घोषणा महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली. सूचना विरोधकांनी मांडली होती हे सभागृहनेते श्रीनिवास करलींसह कोणाच्या ध्यानात आली नाही, त्यामुळे आता सत्ताधारी भाजपची गोची झाली आहे.

सूचना बहुमताने मंजुरीची घोषणा 
या विषयावर चर्चा झाल्यानंतर सूचना बहुमताने मंजूर असा निर्णय महापौरांनी दिला, ही वस्तुस्थिती आहे. सूचना विरोधकांनी मांडली होती, तर उपसूचना सत्ताधाऱ्यांनी मांडली होती. सूचना मंजूर झाल्याचा निर्णय दिल्याने विरोधकांचे म्हणणे मान्य झाले असा त्याचा अर्थ होतो. 
- रऊफ बागवान, नगरसचिव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Marathi News Esakal
www.esakal.com