राळेगणसिद्धी येथे सौरऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 1 जून 2018

राळेगणसिद्धी (नगर) : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून राळेगणसिद्धी येथे सरकारी जमीनीवर लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. हा प्रकल्प येत्या एक महिन्यात कार्यान्वीत होणार आहे. तो सुरू झाल्यावर येथील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा व तोही पूर्ण दाबाने मिळणार आहे.

राळेगणसिद्धी (नगर) : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून राळेगणसिद्धी येथे सरकारी जमीनीवर लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. हा प्रकल्प येत्या एक महिन्यात कार्यान्वीत होणार आहे. तो सुरू झाल्यावर येथील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा व तोही पूर्ण दाबाने मिळणार आहे.

जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील हा पहिलाच मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. राळेगणसिद्धी येथे या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. येथील सरकारी गायरान जमीनीवर हा प्रकल्प उभारण्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे. सुमारे एक महिन्यात हा प्रकल्प ऊभा कार्यान्वीत होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई येथील वारी एनर्जी ही कंपणी करत आहे. बांधा वापार आणि हस्तांतरीत करा या तत्वावर हे काम होत आहे. या प्रकल्प उभारणीचा सर्व खर्च कंपनीच स्वतः करणार आहे. त्या नंतर येथे तयार होणारी वीज सरकारला म्हणजेच वीजवितरण कंपणीला विकत देणार आहे. व त्यातून आपला खर्च ती वसुल कराणार आहे.

येथे तयार होणारी वीज येथेच वापरली जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात वीजगळती थांबणार आहे. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे. शिवाय येथील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी ही वीज सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळात 12 तास उपलब्ध होणार आहे. त्या मुळे शेतकऱ्यांना रात्री आंधारात किंवा थंडी-वाऱ्यात शेतात पिकास पाणी देण्यास जावे लागणार नाही. शेतकऱ्यांचे वन्यप्राणी व किटकांपासूनही संरक्षण होणार आहे.  

मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प - वापरात येणारे क्षेत्र - 10 एकर (सरकारी जमिन)     
एकूण खर्च - 12 कोटी रूपये.     
तयार होणारी वीज- दोन मॅगावॅट     
सरकारी खरेदीचा दर- 2 रू.98 पैसे प्रतीयुनिट.     
शेतक-यांना 12 तास दिवसा वीज उपलब्ध होणार.     

शेतकऱ्यांना पिकास पाणी देण्यासाठी ही वीज ऊपलब्ध झाल्यावर दिवसभरासाठी शेतीपंपासाठी वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबणार आहेत. राळेगणसिद्धी येथील या प्रकल्पाचा आदर्श घेऊन राज्यभरात गावोगाव असे प्रकल्प ऊभे करावेत त्या साठी स्थानिक स्वराज्यसंस्था, ग्रामपंचायत किंवा पतसंस्था यांनी पुढाकार घ्यावा व आपल्या गावात लागणारी वीज आपणच तयार करावी आणि गाव वीजेच्या बाबतीत स्वावलंबी करावे.
- सुरेश पठारे, सामाजिक कार्यकर्ते, राळेगणसिद्धी.     

Web Title: solar plant will active in ralegansiddhi in coming days