लवकरच पाईपलाईनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा : पालकमंत्री जयंत पाटील

बलराज पवार
Monday, 10 August 2020

सांगली-  जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यात लवकरच घरगुती वापराचा गॅस पाईपलाईन द्वारे सहजरीत्या उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी संबंधित भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांशी पालकमंत्री जयंत पाटील यांनी चर्चा केली. 
जिल्हाधिकारी कार्यालयात ल्हिाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांशी पाईपलाईनने घरगुती गॅस पुरवण्याबाबत चर्चा केली. 

ते म्हणाले, दाभोळहुन कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या भारत गॅसच्या एका पाईपलाईनमार्फत इस्लामपूर, आष्टा, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात पाईपलाईनद्वारे घरपोच आणि स्वस्त गॅस पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच या मार्गात येणाऱ्या गावांची सुद्धा मागणी असल्यास त्यांनाही गॅस पाईपलाईन द्वारे पुरविण्यात येईल. या आधुनिक पध्दतीचे सर्व नागरिक स्वागत करतील असा विश्वास आहे. याशिवाय पेट्रोल पंपवरदेखील भारत गॅस मार्फत सीएनजी गॅस पुरवठा सुरू केला जाईल जेणेकरून वाहतूक व्यवस्थेसाठी लागणारे इंधन कमी दरात उपलब्ध होईल. 

जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेचे सीईओ या सर्वांची बैठक घेऊन भारत गॅस कंपनीला आवश्‍यक सर्व प्रशासकीय मदत करण्याच्या सूचना केल्या जातील. येत्या 12 ते 15 महिन्यात ही आधुनिक सुविधा जिल्ह्यातील तीनही महत्वाच्या शहरांना आणि तेथील नागरिकांना उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार आदी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soon domestic gas supply through pipeline : Guardian Minister Jayant Patil