esakal | Video : चक्क वाघ्या कुत्रा गळ्यातून काढतोय शंख ध्वनी....
sakal

बोलून बातमी शोधा

The sound of a conch from a dog in zare village sangli

झरे गावांमध्ये पुराणकाळी काळातील महादेव मंदिर आहे. या मंदिरामध्ये वाघ्या नावाचा कुत्रा रोज सकाळी संध्याकाळी गणपत बुवा ज्या ज्या वेळेला शंख वाजवतात, त्या त्या वेळेला तो कुठेही असो धावत पळत येऊन त्याच्या भाषेमध्ये शंखाचा स्वर काढण्याचा प्रयत्न करतो.

Video : चक्क वाघ्या कुत्रा गळ्यातून काढतोय शंख ध्वनी....

sakal_logo
By
सदाशिव पुळके

सांगली - आटपाडीच्या पश्चिम भागातील सातारा व सांगली च्या सीमेवरील झरे परिसर कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्याचच एक उदाहरण म्हणजे गावांमध्ये पुराणकाळी काळातील महादेव मंदिर आहे. या मंदिरामध्ये पहाटेपासूनच पूजा करण्यासाठी भक्तांची रांग लागते.

शंखाचा स्वर काढण्याचा प्रयत्न

 बृहन्मुंबई नगरपालिकेचे सेवानिवृत्त गणपत विठोबा अर्जुन यांना भक्तीची आवड असल्याने तेही महादेवाच्या मंदिरा मध्ये दर्शनासाठी येतात.भजन प्रवचन करतात.ते दररोज सकाळी व सायंकाळी महादेव मंदिरामध्ये शंख वाजवतात ही त्यांची पूर्वीपासूनचा दिनक्रम आहे. मंदिराच्या शेजारीच बापू पाटील हे राहतात. ते शेतकरी असल्याने बैल,गाय व घराच्या राखण्यासाठी दोन कुत्री पाळलेली आहेत. त्यापैकी वाघ्या नावाचा कुत्रा रोज सकाळी संध्याकाळी गणपत बुवा ज्या ज्या वेळेला शंख वाजवतात, त्या त्या वेळेला तो कुठेही असो धावत पळत येऊन त्याच्या भाषेमध्ये शंखाचा स्वर काढण्याचा प्रयत्न करतो.ही एक त्याला लागलेली सवयच आहे.

वाचा - एक नव्हे तर तब्बल पाच परिक्षा झाला तो उत्तीर्ण...

गेले पाच वर्षापासून हा कुत्रा त्याच्या भाषेत शंख वाजवतो . अर्जुन बुवांची कुठूनही चाहूल लागली किंवा त्यांच्या बोलण्याचा आवाज आला तर तो कुत्रा कुठेही असो तो धावत पळत त्याठिकाणी येतो अर्जुन बुवा ही त्या कुत्र्यावर अफाट प्रेम करतात.

वाघ्या कुत्र्याला पाहण्यासाठी गर्दी

मुक्या  प्राण्याला आपण ज्या पद्धतीने सवय लावतोय त्याच पद्धतीने तो कृती करत राहतो हे यावरून दिसून येत आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा असा कुत्रा आवाज काढू लागला, त्यावेळेला कुत्रा रडतोय की काय म्हणून बरेच जण त्या कुत्र्याला हाकलायचे. परंतु पुन्हा लोकांच्या लक्षात आलं की ज्या पद्धतीने गणपत अर्जुन बुवा हे शंख वाजवतात, त्याच पद्धतीने तो कुत्रा त्याच्या भाषेत आवाज काढण्याचा प्रयत्न करतो आहे. याचे लोकांना आश्चर्य वाटू लागलं आणि बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली. सध्या बरेच जण तो कुत्रा कशा पद्धतीने ओरडतो हे पाहण्यासाठी येऊ लागले आहेत.सध्या महादेव मंदिरांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या सप्ताह निमित्त अनेक भक्त तिथे येत असतात आणि काही जण आवर्जून त्या दोघांना बोलवून शंख वाजवण्यास लावतात व कुत्रा कसा ओरडतो किंवा त्याच्या भाषेमध्ये आवाज काढतो हे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.