दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर फडकला तिरंगा! इस्लामपूरच्या राजश्री पाटील

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला
राजश्री पाटील
राजश्री पाटीलsakal

इस्लामपूर : अठरा तासांचा खडतर प्रवास करत इस्लामपूरच्या राजश्री पाटील यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर मानल्या जाणाऱ्या 'किलीमांजारो'वर भारताचा ध्वज फडकवला आहे. उरू पिक टांझानिया असे नाव असलेल्या ५८९५ मीटर उंचीवर त्यांनी आपला तिरंगा फडकवला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला. १४ ऑगस्टला चढाई करून पंधरा ऑगस्टला सकाळी ८ वाजता त्यांनी हा तिरंगा फडकवला.

राजश्री जाधव-पाटील यांचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील कापूसखेड आहे. त्या सध्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नियंत्रक पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा हा त्यांचा मूळ विभाग असून मे २०२२ मध्ये त्या प्रतिनियुक्तीवर पदोन्नतीने कृषी विद्यापीठात दापोली येथे नियुक्त झाल्या आहेत. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सन २०२२ हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष याचेही औचित्य साधून विद्यापीठाचा देखील झेंडा दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो वर त्यांनी फडकवला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी हिमालयातील कांगस्त्ये शिखर सर करावयाच्या मोहिमेत भाग घेतला होता; मात्र खराब हवामानामुळे त्यांना पाच हजार मीटर उंचीवरून शिखर सर न करताच परत फिरावे लागले होते.यापूर्वी त्यांनी हिमालयातील ४२०० मीटर उंचीचे पतालसू हे शिखर सर केले आहे.

अटलबिहारी वाजपेयी माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूटमधून त्यांनी बेसिक माउंटेनियरिंगचा कोर्स केला आहे. सह्याद्री रांगामध्ये एकूण पाच वेळा महाराष्ट्राचे सर्वोच्च असे कळसूबाई हे शिखर सर केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रशासनमधील जवळपास १५० महिला अधिकारी यांना घेऊन या मोहिमा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. तसेच चढाईस कठीण मानला जाणारा लिंगाना हा किल्ला त्यांनी सर केला आहे. याचबरोबर त्यांनी सह्याद्रीमध्ये रायगड प्रदक्षिणा, पन्हाळा पावनखिंड हा ४६ किमीचा ट्रेक तसेच पन्हाळा पावनखिंड विशाळगड हा ६३ किमीचा ट्रेक सलग केला असून याचबरोबर सह्याद्रीमधील राजगड, तोरणा, प्रतापगड असे गडकिल्ले अनेकवेळा सर केले आहेत. त्यांना कोकण विद्यापीठाचे कुलगुरू संदीप सावंत, राजर्षी शाहू अकॅडमीचे संस्थापक डॉ.विक्रांत पाटील, संदीप नाझरे, वैभव राजे-घाडगे,आई-वडील यांनी प्रोत्साहन दिले.

"किलीमांजारोवर निश्चितस्थळी पोचल्यावर आपला तिरंगा फडकवताना अभिमान वाटला. राष्ट्रगीत म्हणाले. आणि एक सूर्यनमस्कारही घातला. आजवर मी ज्या-ज्या ठिकाणी गेले आहे, त्या प्रत्येक ठिकाणी सूर्यनमस्कार घातला आहे. चांगल्या आरोग्याचा संदेश (फिटनेस) म्हणून मी जिथे-जिथे संधी मिळेल तिथे सूर्यनमस्कार घालण्याविषयी बोलत असते. एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न आहे आणि तिथेही पोचल्यानंतर मी सूर्यनमस्कार घालेन."

राजश्री पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com