

Soybean bags displayed at an agricultural market yard.
sakal
सांगली : गेल्या आठवडाभरात सोयाबीनच्या बाजारभावाने हमीदराचा टप्पा ओलांडत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. हमीभाव ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल असताना सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला ५,६०० ते ५,८०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने हमीभाव खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.