
सांगली : सरकारच्या मिशन बिगेन अगेन टप्पा दोन जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सोशल डिस्टसिंगचे पालन होत नाही. कोरोनाची लढाई अद्याप संपलेली नसल्याने मास्क न लावणे, मोटरसायकलवरुन दोघांचा प्रवास, शहरी, ग्रामीण भागातील दुकानांत होत असलेल्या उल्लंघनाबाबत दंडात्मक कारवाईसाठी आगामी सात दिवस सोशल डिस्टसिंगसाठी विशेष मोहिम राबवली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपीला सुरुवात झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले.
मिशन बिगेन अगेन टप्पा दोनबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. लोकांना काही प्रमाणात मुभा देण्यात आली असली तरी मास्क न लावणे यासह सोशल डिस्टसिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाशी आपण सामना करीत असून त्यासाठी नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे. शहर तसेच ग्रामीण भागात मास्क लावलेले नसतात. मोटरसायकलवरुन एका व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा आहे, मात्र सरसकट दोन व्यक्ती प्रवास करताना दिसतात. दुकाने तसेच भाजीमंडईमध्येही सोशल डिस्टसिंगचे पालन होत नाही, यामुळे येत्या सात दिवस सोशल डिस्टसिंगसाठी विशेष मोहिम राबवली जाईल. दुकानांत नियम उल्लंघनाबाबत दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले...
कोरोना मृत्यूबाबत समिती गठित
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याबाबतचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित केली आहे. समितीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, टीएचओ, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाने मृत्यू झाला का?, उपचार पद्धत व्यवस्थित होती का, रुग्णाबाबतचा कारणांचा शोध समितीकडून घेतोय.
खासगी दवाखान्यांतील रुग्ण सरकारीमध्ये पाठवा
गेल्या काही दिवसांपासून खासगी दवाखान्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तेथे उपचार केले जातात. खासगी दवाखान्यांमध्ये कोरोना संशयित असल्यास सरकारी हॉस्पिटलमध्ये तात्काळ पाठवावे, याबाबतचे लेखी आदेश काढणार आहे.
अंत्यविधी, लग्नासाठी 50 लोकांना परवानगी
अंत्यविधीसाठी यापुर्वी 20 लोकांना परवानगी होती, परंतु त्यामध्ये बदल करीत आता 50 लोकांना एकत्र येता येईल. लग्न समारंभासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीत बदल झालेला नाही. संचारबंदी रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी राहिल.
कामगार, शेतकऱ्यांच्या पासला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
आंतरराज्य आणि अंतर जिल्हा प्रवेश बंदी कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नोकरदार, कामगार, शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यात नोकरीला आहेत. त्यांच्यासाठीच्या ई-पासना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.