Mother's Day Special : कसरत.. आई आणि कोरोना योध्दा म्हणून!

आई... नेहमीच कुटुंब आणि चिमुरड्यांच्या सुरक्षेसाठी जीवापाड खटपट करते
Mother's Day Special : कसरत.. आई आणि कोरोना योध्दा म्हणून!

सांगली : आई...ती नेहमीच आपल्या कुटुंब आणि चिमुरड्यांच्या सुरक्षेसाठी जीवापाड खटपट करीत असते. सध्याच्या कोरोना संकटकाळात आई (mothers day special) आणि कोरोना योध्या ( covid-19) अशा दुहेरी भुमिकेत असणाऱ्या मातांचे मनोगत आजच्या ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने.

"गेले वर्षभर कोविड विरोधातील लढाई सारेच लढत आहेत. अशा संकटकाळात घराबाहेर पडायला लागतं तेव्हा मुलं सर्वाधिक काळजीत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसते. माझी दोन्ही मुलं आता या प्रसंगाला सरावली आहेत. बाहेरून मी घरी आले आणि बेल वाजली की त्यांची लगबग सुरु होते. आल्या आल्या ते माझ्या कपड्यांपासून टॉवेलपर्यंतची सारी तयारी करतात. थोडा उशीर झाला तरी फोन करून विचारणा करतात. रात्री-अपरात्री कोविड सेंटरला (covid-19 center) जावं लागलं तरी येईपर्यंत ती जागीच असतात. मात्र त्यांना आता ही सारी परिस्थिती सरावाची झाली आहे. मुलांना स्वयंपूर्ण केलं पाहिजे. या काळात मी स्वयंपाकाचीही जबाबदारी घेतली आहे. त्यांची सकारात्मक मानसिकता घडवली पाहिजे. ती माझ्यासाठीही कामाची उर्जा आहे"

- स्मृती पाटील, उपायुक्त महापालिका

Mother's Day Special : कसरत.. आई आणि कोरोना योध्दा म्हणून!
चालकांचाही खोळंबा; अपुऱ्या रुग्णवाहिकांमुळे सेवेत येतोय अडथळा

"माझी चोवीस तासाची ड्युटी (24 hours duty) मुलांना सवयीची आहे. कुटुंबाला-मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. सध्याच्या कोरोना काळात तर ते आणखी बिकट. माझा मुलगा विश्‍वेष दुसरीत शिकतो. वेळ मिळेल तेव्हा त्याच्या भरपूर बोलते. त्यांच्या आवडी निवडी जपण्यावर भर देतो. त्याला निसर्गाची फार आवड आहे. ती आवड जपण्यासाठी मी त्याच्यासोबत वेळ मिळेल तेव्हा असते. सध्याच्या संकटकाळात मास्क-सॅनिटायझेशनचा (mask sanitizer) तो मलाच आग्रह करतो. मुलं आपल्यालाही शिकवत असतात."

- मनिषा दुबुले, अप्पर पोलिस अधीक्षक, सांगली

"माझा मुलगा सिद्धार्थ हा बारावीत आहे. गेले वर्ष आणि यंदाचे वर्ष महत्वाचं, नोकरी आणि आईची भूमिका (mother roll) माझ्यासाठी मोठी सर्कस होती. त्याच्या अभ्यासाकडे माझे सतत लक्ष होते. कोरोनाकाळात चांगले वाचन ठेवून सकारात्मक दृष्टीकोन राहील यासाठी मी प्रयत्न केले. त्यासाठी नव-नव्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न असतो. तोदेखील माझी तितकीच काळजी घेतो. ड्युटीवरून आले की मला कोणता त्रास होऊ नये यासाठी तोच मला मदत करीत असतो. या संकटकाळात आमच नातं अधिक घट्ट झालं आहे."

- प्रज्ञा देशमुख, सहायक निरीक्षक, वाहतूक शाखा, सांगली

"आशा वर्कर्संना सतत पुढं राहून काम करावं लागतं. त्यांच्या कुटुंबियांना सतत काळजी असते. आता माझी मुलं मोठी आहेत मात्र ती जेव्हा त्यांच्या मित्रमंडळीत वावरतात तेव्हा सहजपणे त्यांना त्यांचे मित्र म्हणून जातात अरे बाबा याची आई सतत कोविड रुग्णांमध्ये असते. काळजी घ्या. हेच प्रत्येक आशा वर्कर्सच्या वाट्याला येते. एक आई आणि आशा म्हणून अशा दुहेरी भूमिकेत काम करताना ही कसरत प्रत्येकच्या वाट्याला येते."

- विद्या कांबळे, आशा वर्कर्स

Mother's Day Special : कसरत.. आई आणि कोरोना योध्दा म्हणून!
राजधानी आणखी आठवडाभर 'लॉक', मुख्यमंत्र्यांची घोषणा

गेले वर्ष टाईट गेलं. प्रभागात फेरफटका मारायला जाण्याआधी घरचं आवरावं लागतं. मुलांची खाण्यापिण्याची व्यवस्था करूनच मग महापालिकेत जाते. बाहेर जावं लागतं याची सर्वांनाच काळजी असते. मुले लहान असल्याने ती अधिकच. संध्याकाळचा वेळ त्यांच्यासाठी राखून ठेवलेला असतो. सध्याच्या काळात माझे पती राहुल हेही 'आई'ची जबाबदारी पार पाडतात. हे वर्ष बरेच धडं देणारं ठरलं. आई म्हणून मला अधिक समृध्द करणारं ठरलं.

- गीतांजली ढोपे-पाटील, सभापती महिला व बाल कल्याण समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com