
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च-2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (13 मे) रोजी लागला आहे. या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.पण या निकालात सोलापूरमधील असे दोन विद्यार्थी आहेत, ज्यांनी लोकांना तोंडात बोटं घालायला भाग पाडलं आहे. 100 टक्के मार्क मिळवणाऱ्यांसोबत किंवा त्यांच्यापेक्षा काही जास्त कौतुक या पठ्ठ्यांचं होत आहे.